Skip to content

३७ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन
१ व २ फेब्रुवारी २०२५

शेवगाव, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर (अहमदनगर)
आयोजकन्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, शेवगाव

३७ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन १ व २ फेब्रुवारी २०२५ रोजी न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, शेवगाव, ता. शेवगाव, जि-अहिल्यानगर (अहमदनगर) या ठिकाणी संपन्न होत आहे. तरी या संमेलनात आपण सहभागी व्हावे ही महाराष्ट्र पक्षिमित्र संघटना व आयोजकांच्या वतीने नम्र विनंती करण्यात येत आहे.

नाव नोंदणीसाठी वरील बटण वर क्लिक करा.

तसेच समाजमध्यामांमध्ये लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी खालील व्यक्तींशी किंवा इमेल वर संपर्क करू शकता.

डॉ. यु. डी. शेरखाने (7972056408) / प्रा. सचिन पवार (9689701052)

Email : pakshimitrasammelan2025@nacscs.ac.in

‘पक्षिमित्र पुरस्कार’ (२०२४) जाहीर

गेली चार दशके महाराष्ट्रात पक्षीविषयक कार्य करणारी संस्था “महाराष्ट्र पक्षिमित्र” तर्फे देण्यात येणाऱ्या २०२४  च्या पक्षिमित्र पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, यावर्षीचा पक्षिमित्र जीवन गौरव पुरस्कार पंढरपूर येथील श्री. गोविंद रघुनाथ सबनीस यांना जाहीर करण्यात आला.

वर्ष – १५ वे. अंक – २ ला. १ जानेवारी २०२५. पाने २४.

पक्षिमित्र अंक

मानवाचा प्राचीन इतिहास ते भविष्य याचे अद्भुतरित्या विश्लेषण करणारे लेखक युवाल नोवा हरारी. यांचे पुस्तक प्रकाशित होणे ही विश्वातील मोठी घटना समजली जाते. ते मागील महिन्यात आपल्या नेक्सस या पुस्तकाच्या प्रचारासाठी भारतात येऊन गेले. सोशल मीडियावरील लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते म्हणतात, “Most information, it’s junk. Truth is often expensive and complicated, while fiction is cheap, simple, and abundant.”

जगामध्ये जी काही माहिती मोठ्या प्रमाणात पसरवली अथवा पोहोचवली जाते ती जास्त करून खरी नसते आणि जशी जशी नवीन तंत्रज्ञानांमधून ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल ती अधिकाधिक फिक्शन चे स्वरूप घेईल. या माहितीच्या जंजाळापासून पक्षी विश्वही कसे अपवाद राहील. यात सुद्धा संशोधनात्मक ज्ञानापेक्षा बऱ्याचदा खोटी माहितीच पसरवली जाते. उदाहरणार्थ, ‘पक्षाला एकदा माणसाने हात लावला की त्यांना इतर पक्ष टोचून मारतात. चातक पक्षी पावसाच्या पाण्यावरच जिवंत राहतात. पक्षांना खाद्य, पाणी नियमितपणे दिल्याने त्यांचे संवर्धन होईल. ‘ या गोष्टींवर बहुसंख्य चटकन विश्वास ठेवतात त्यामुळे निसर्गाच्या अन्नसाखळीतील महत्त्वाच्या या घटकाचे सामान्य करून होऊन जाते.

Maharashtra Pakshimitra

Who we are and what we do

The beginning

१९८१ साली श्री. प्रकाश गोळे यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र पक्षीमित्र संस्थेचे कार्य चालू झाले.

Newsletter

पक्षिमित्र – महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेचे त्रैमासिक मुखपत्र. प्रथम अंक १९९३ मध्ये प्रकाशित करण्यात आला.

Pakshimitra Sammelan

प्रतिवर्षी महाराष्ट्र पक्षीमित्र संस्थेचे संमेलन नोव्हेंबर ते फ़ेब्रूवारी या कालावधीत महाराष्ट्रात कोठेतरी भरते.

Bird Rescue

पक्षीमित्र मदत / बचावकार्य / Bird Rescue. District wise Contact Bird Rescue (Pakshimitra)

Bird census

सन २०१० पासुन संस्थेच्या वतीने महापक्षी गणनेचे आयोजन करण्यास सुरूवात झाली. सर्वसाधारण पणे जानेवारी महीन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यामध्ये ही गणना घेण्यात येते.

Fellowships

महाराष्ट्रातील तरुण पक्षी अभ्यासकास दरवर्षी स्व. प्रकाश गोळे महाराष्ट्र पक्षिमित्र शिष्यवृत्ती (Late Prakash Gole Maharashtra Pakshimitra Fellowship) देण्यात येणार आहे.

इतर समविचारी लोकांना जोडून घ्या


तसेच आपल्या परिचयातील ज्या व्यक्तींना महाराष्ट्र पक्षिमित्र चे आजीवन सभासदत्व घ्यावायचे आहे, त्यांना आपण खालील लिंक पाठवू शकता.