White Eye
Small blue kingfisher
Greater Coucal (also called as Crow-pheasant)
Little egret

आगामी पक्षीमित्र संमेलन, चंद्रपूर, विदर्भ(Click here for details)

चौथे कोंकण पक्षीमित्र संमेलन १७ मे

 

 

 

 

चिपळूण येथील निसर्ग संवर्धन कार्यामध्ये कार्यरत असणा-या सह्याद्री निसर्ग मित्र या संस्थेतर्फे रविवार दिनांक १७ मे २०१५ रोजी `चौथे कोंकण पक्षीमित्र संमेलन’ चिपळूणातील भोगाळे येथील माधव सभागृह येथे भरवण्यात येणार आहे. कोकण विभागातील स्थानिक लोकांची निसर्गाप्रती आवड पाहून संस्थेने सर्वप्रथम १९९७ साली संमेलनाचे आयोजन केले होते.यापुर्वी तीन कोकण पक्षीमित्र संमेलने आयोजीत केली गेली होती. तिसरे कोकण पक्षीमित्र संमेलन खेड येथे १९९९ साली भरवण्यात आले होते. तद्नंतर खंडीत झालेले चौथे संमेलन भरवण्याचे संस्थेने योजले आहे.

राज्यस्तरीय महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनादरम्यान होणा-या चर्चा व घडामोडी आता स्थानिक लोकांना या संमेलनाद्वारे जवळून अनुभवता येतील. स्थानिक लोकांची कोकण किनारपट्टीतील पक्षी संवर्धनाची असणारी तळमळ पाहून या संमेलनाचे विषय योजण्यात आले आहेत. कोकणात पक्षांची विविधता भरपूर आहे व आता अनेक पक्षीमित्र आपापल्या पातळीवर कार्य करत आहेत. याना एकत्र आणणे हा मुळ उद्देश आहे. 

संमेलनामध्ये विविध तज्ञांची सादरीकरणे होतील. तसेच कोकण विभागातून पक्षी संवर्धनाच्या कार्यात यूवक आणि लहान मूलांचा सहभाग वाढत आहे. त्यांना व्यासपीठ मिळवून देणे हा देखील या संमेलनाचा उद्देश आहे.

कोकण विभागात आढळणा-या गिधाडांच्या दोन प्रजातींच्या संरक्षण व संवर्धनाचे कार्य संस्थेमार्फत युद्धपातळीवर सुरु आहे. गावोगावी फिरुन गिधाडांची माहीती मिळवण्यापासून ते घरट्यांच्या सर्वेक्षणाचे काम सध्या संस्था पाहत आहे या कार्यामध्ये वनविभाग, महाराष्ट्र शासन तसेच रफर्ड सारख्या संस्था या कामामध्ये संस्थेला मदतीचा हात देत आहेत. "गिधाडांच्या खाद्याच्या दृष्टीने कोकणात उघडयावर गुरे टाकल्या जाणार्‍या गावांचे सर्वेक्षणहि हाती घेण्यात आले आहे." सध्या या पक्ष्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे. सदर प्रकल्पाची सध्यस्थिती व उपाय योजना याबाबत संमेलनामध्ये चर्चासत्र होणार आहे.

तरी या संमेलनाला आपण सर्व पक्षीमित्र उपस्थित रहाल अशी आशा आहे. कार्यक्रमाचे उद्घाट्न सकाळी ठिक १० वाजता होइल, तसेच कार्यक्रमाचा समारोप साय. ६ वाजता होइल. सदर संमेलनासाठी कोणतेही शुल्क ठेवण्यात आले नसून चहा-नाष्टा तसेच दूपारच्या भोजनाची सोय करण्यात आली आहे. तरी इच्छूक व्यक्तींनी दिनांक १० मे पर्यंत आपली नावे नोंदवणे आवश्यक आहे. तसेच संमेलनात सादरीकरण करु इच्छीणा-यांनी आपल्या सादरीकरणाची संपुर्ण माहीती १० मे सायंकाळी ०५.३० पर्यंत संस्थेच्या कार्यालयामध्ये देणे आवश्यक आहे. संमेलन एक दिवसाचेच असल्यामुळे वेळ फार कमी आहे त्यामुळे सादरीकरणे १० मिनिटांची असतील याची नोंद घ्यावी. अधिक माहीती व नाव नोंदणीसाठी संपर्क: (०२३५५) २५३०३०, श्री. भाऊ काटदरे - ९३७३६१०८१७, Email: sahyadricpn@gmail.com 

 

 

 

Search

Latest 'PakshiMitra' magazine

PakshiMitra magazine

Featured photo

Red-Munia.jpg

कार्य

पक्षीमित्र संमेलने, पक्षी अभ्यास, पक्षी गणना, पक्षीमित्र पुरस्कार इ. कार्यक्रम आयोजित करुन पर्यावरणाचा प्रचार, प्रसार, संवर्धन, संरक्षण करणे.

उद्दिष्ट

'मिळून सारेजण करु व्दिजगण रक्षण!' या आमच्या ब्रीदवाक्याप्रमाणे पक्षांचे संरक्षण करणे आणि महाराष्ट्रातील सर्वदूर पसरलेल्या पक्षीमित्रांचे संघटन व त्यांचे कार्य एकत्रितपणे पुढे आणणे.

Support us

Maharashtra Pakshimitra has been striving to protect Birds of Maharashtra since the past 20 years. Being a non-profit NGO, we rely on your help in securing funds. Please contribute.