महाराष्ट्र पक्षीमित्र तर्फे घेतल्या जाणाऱ्या महा पक्षी गणनेत २०१२ या वर्षी अपेक्षेहून जास्त लोक सहभागी होताना दिसून आले. महाराष्ट्रातील ही महा पक्षी गणना २२ ते २९ जानेवारी २०१२ यादरम्यान घेण्यात आली. वृत्तपत्रांतील जाहिरातीत दिल्या प्रमाणे सर्व स्तरातील व वयोगटातील लोक यात सहभागी झाले होते. पक्ष्यांची गणना, त्यांची सध्याची परिस्थिती व माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचावी व त्यांना ती आत्मसात करता यावी हा यामागचा हेतू आहे. गवताळ प्रदेश, धरणे, तलाव, समुद्रकिनारे, चिखलीय प्रदेश, खारफुटी जंगल, शहरे, बागा इत्यादी विविध अधिवासात २६६ जातींच्या एकुण १,३०,४०० पक्ष्यांची नोंद केली गेली. सर्वात जास्त पक्षी जळगांव (५९,६८८) येथे नोंदण्यात आले तर त्या पाठोपाठ सोलापुर (३०,४९६) आणि भुसावळ (२३,५८०) येथे पक्ष्यांची नोंद झाली. अशा प्रकारे जळगाव जिल्ह्यामध्ये निरनिराळ्या जातीचे १४९ पक्षी हंतुर धरणाजवळ आणि संख्येमध्ये जास्त असलेले २४,५३१ पक्षी हिप्परगा भागात आढळुन आले.

 Read Report (PDF) मराठी | English

 View gathered data (Microsoft Excel File)