Skip to content

वर्ष – १४ वे. अंक – ४ था. १ जुलै २०२४. पाने – २८.

पक्षिमित्र अंक

“भारतात सापडणाऱ्या सर्वच हॉर्नबिल प्रजाती सध्या संकटात आहेत. महाराष्ट्रात धनेश अर्थात होनबेलच्या चार प्रजाती आढळून येतात. यामध्ये राखी धनेश, मलबारी धनेश, मलबारी कवडा धनेश व महाधनेश या प्रजाती आहेत. यातील मलबारी धनेश हा फक्त मलबार प्रदेशात म्हणजे महाराष्ट्रात फक्त सह्याद्रीतच आढळतो.
सह्याद्री मधील विविध प्रकल्प आणि बदलत्या संस्कृतीमुळे जंगलाचे प्रमाण झपाट्याने कमी होत आहे. जंगलातील मोठाली झाडे तोडली जात असल्याने हॉर्नबिलच्या संख्येवर त्याचा विपरीत परिणाम दिसून येत आहे. या प्रजातींच्या संवर्धनाची दिशा ठरवण्यासाठी यावर्षी प्रथमच धनेश मित्र संमेलन पार पडले धनेश मित्र निसर्ग मंडळ व सह्याद्री प्रकल्प सोसायटी यांच्या संकल्पनेतून हे संमेलन मार्च महिन्यात रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख येथे पार पडले.”

महाराष्ट्र पक्षिमित्र पुरस्कार २०२४

२०२४ या वर्षासाठी ‘महाराष्ट्र पक्षिमित्र जीवन गौरव पुरस्कार, महाराष्ट्र पक्षिमित्र संशोधन पुरस्कार, महाराष्ट्र पक्षिमित्र संवर्धन व सुश्रुषा पुरस्कार, महाराष्ट्र पक्षिमित्र जनजागृती पुरस्कार, पक्षी साहित्य पुरस्कार’ या पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

Maharashtra Pakshimitra

Who we are and what we do

The beginning

१९८१ साली श्री. प्रकाश गोळे यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र पक्षीमित्र संस्थेचे कार्य चालू झाले.

Newsletter

पक्षिमित्र – महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेचे त्रैमासिक मुखपत्र. प्रथम अंक १९९३ मध्ये प्रकाशित करण्यात आला.

Pakshimitra Sammelan

प्रतिवर्षी महाराष्ट्र पक्षीमित्र संस्थेचे संमेलन नोव्हेंबर ते फ़ेब्रूवारी या कालावधीत महाराष्ट्रात कोठेतरी भरते.

Bird Rescue

पक्षीमित्र मदत / बचावकार्य / Bird Rescue. District wise Contact Bird Rescue (Pakshimitra)

Bird census

सन २०१० पासुन संस्थेच्या वतीने महापक्षी गणनेचे आयोजन करण्यास सुरूवात झाली. सर्वसाधारण पणे जानेवारी महीन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यामध्ये ही गणना घेण्यात येते.

Fellowships

महाराष्ट्रातील तरुण पक्षी अभ्यासकास दरवर्षी स्व. प्रकाश गोळे महाराष्ट्र पक्षिमित्र शिष्यवृत्ती (Late Prakash Gole Maharashtra Pakshimitra Fellowship) देण्यात येणार आहे.

इतर समविचारी लोकांना जोडून घ्या


तसेच आपल्या परिचयातील ज्या व्यक्तींना महाराष्ट्र पक्षिमित्र चे आजीवन सभासदत्व घ्यावायचे आहे, त्यांना आपण खालील लिंक पाठवू शकता.