Late Annasaheb Waze memorial / Late Prakash Gole Maharashtra Pakshimitra Fellowship
२०२३-२४ या वर्षातील शिष्यवृत्ती स्व. अण्णासाहेब वझे यांचे स्मृती प्रित्यर्थ श्री. उदय वझे, अकोला यांनी प्रायोजित केली आहे
नियमावली –
१. अर्जदार महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असावा. किमान १२ वी पास, पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेत असल्यास उत्तम. वयोमर्यादा १८ ते २५ वर्षे ( + २ वर्षे )
२. अभ्यास/ संशोधन प्रस्ताव विहित नमुन्यात, विहित कालावधीत महाराष्ट्र पक्षिमित्रकडे सादर करण्यात यावा. प्रस्ताव इंग्रजी किंवा मराठी मध्ये असावा.
३. संशोधन प्रकल्प महाराष्ट्र राज्य क्षेत्रातील असावा. संरक्षित क्षेत्रातील अभ्यास प्रकल्पासाठी रीतसर परवानगी घेण्याची जबाबदारी अर्जदाराची असेल.
४. संशोधन / अभ्यास क्षेत्र हे पक्षी विषयक संशोधन, संवर्धन, सर्वेक्षण अथवा जनजागृती सबंधित असू शकेल.
५. अभ्यास/ संशोधन प्रकल्पाचा कालावधी ६ महिने ते १ वर्ष इतका असावा.
६. प्रकल्प सादर करतांना शाळा महाविद्यालयाचे किंवा मार्गदर्शकाचे शिफारसपत्र सोबत जोडणे आवश्यक आहे.
७. पहिला अंतरिम अहवाल ६ महिन्यानंतर सादर केल्यानंतर शिष्यवृत्ती ५० टक्के रक्कम अदा करण्यात येईल. उर्वरित रक्कम व प्रमाणपत्र संपूर्ण अहवाल सादर केल्यानंतर व समितीने मंजूर केल्यानंतर पुढील संमेलनात देण्यात येईल.
८. प्राप्त प्रस्तावामधून एका उत्कृष्ट प्रस्तावाची निवड, महाराष्ट्र पक्षिमित्रच्या निवड समिती कडून करण्यात येईल व तसे संबंधिताना कळविले जाईल.
९. अभ्यास प्रकल्पावर आधारित शोध निबंध, लेख, सादरीकरण इ. मध्ये “महाराष्ट्र पक्षिमित्र” चा उल्लेख करणे अनिवार्य राहील. प्रकल्पावर आधारित लेख “पक्षिमित्र” अंकासाठी लिहून पाठवावा लागेल तसेच या विषयावरील सादरीकरण संमेलनात करण्यात यावे.
१०. महाराष्ट्र पक्षिमित्र कार्यकारिणी सदस्य, सल्लागार मंडळ तसेच पक्षिमित्र संपादक मंडळ यांचे कुटुंबीय या शिष्यवृत्ती साठी ग्राह्य धरले जाणार नाहीत.
शिष्यवृत्तीचे प्रस्ताव पाठविण्याची अंतिम तारीख २५ नोव्हेंबर २०२३ आहे. आपले प्रस्ताव महाराष्ट्र पक्षिमित्रच्या पत्त्यावर, कार्यवाह, महाराष्ट्र पक्षिमित्र, व्दारा प्रा.डॉ. गजानन वाघ, ६३, अरण्यार्पण, समता कॉलनी, कठोरा रोड, व्हीएमव्ही पोस्ट, अमरावती ४४४६०४ किंवा Scan केलेला संपूर्ण प्रस्ताव PDF स्वरुपात संस्थेचा इमेल- pakshimitra@gmail.com वर पेपरलेस सुद्धा पाठविता येईल. अर्जाचा नमुना व शिष्यवृत्ती सविस्तर माहिती येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे.