३६ वे पक्षीमित्र संमेलन
३६ व्या महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. सालिम अली यांच्या भव्य रांगोळीचे अनावरण करतांना मान्यवर.
३६ वे पक्षीमित्र संमेलन
सांगली येथील ३६ व्या महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनाचे उद्घाटन रोपट्याला पाणी घालून करण्यात आले. यावेळी उद्घाटक श्री. राजेंद्र केरकर, प्रमुख उपस्थिती डॉ एरीक भरुचा, म.प. चे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर, आयोजक संस्थेचे श्री. शरद आपटे, स्वागताध्यक्ष डॉ. रवींद्र व्होरा व डॉ. गजानन वाघ.
३६ वे पक्षीमित्र संमेलन
श्री अजितकुमार उर्फ पापा पाटील यांना संमेलनाध्यक्ष पदाचा कार्यभार म.प. चे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर व आयोजक संस्थेचे श्री. शरद आपटे यांनी संस्थेचा ध्वज देऊन सोपविण्यात आला
३६ वे पक्षीमित्र संमेलन
श्री. शरद आपटे यांचे पक्षिगान .. का? केव्हा? कोठे? या पुस्तकाचे प्रकाशन करतांना संमेलनाचे उद्घाटक श्री. राजेंद्र केरकर, म.प. चे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर, कार्यवाह प्रा. डॉ. गजानन वाघ आणि लेखक श्री. शरद आपटे.
३६ वे पक्षीमित्र संमेलन
संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी निसर्गकट्टा, अकोला तर्फे तयार केलेली पक्षी विषयावरील दिनदर्शिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले यावेळी या दिनदर्शिकेच्या निर्मितीमध्ये योगदान देणारे सर्व पक्षिमित्र उपस्थित होते.
३६ वे पक्षीमित्र संमेलन
सांगली जिल्हा पक्षी मार्गदर्शिका या पुस्तकाचे प्रकाशन संमेलनात करण्यात आले. हे पुस्तक संमेलनात सहभागींना विनामूल्य देण्यात आले.
३६ वे पक्षीमित्र संमेलन
संमेलनाच्या समारोप प्रसंगी मंचावर उपस्थित प्रसिद्ध छायाचित्रकार श्री. बैजू पाटील, प्रा. डॉ. निनाद शाह, म.प. चे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर, प्रा. डॉ. गजानन वाघ, श्री. शरद आपटे, डॉ. नंदिनी पाटील इत्यादी मान्यवर

विशेष उल्लेखनीय

३६ वे पक्षीमित्र संमेलन (सांगली)

३६ वे पक्षीमित्र संमेलन (सांगली)


महाराष्ट्र पक्षिमित्रचे पुरस्कार जाहीर

पक्षीमित्र जीवन गौरव पुरस्कार श्री. दिगंबर गाडगीळ यांना जाहीर

महाराष्ट्र पक्षिमित्रचे पुरस्कार जाहीर

पक्षिमित्र जीवन गौरव पुरस्कार श्री. दिगंबर गाडगीळ यांना जाहीर

अमरावती: गेली चार दशके महाराष्ट्रात पक्षीविषयक कार्य करणारी संस्था "महाराष्ट्र पक्षिमित्र" तर्फे देण्यात येणाऱ्या २०२३ च्या पक्षिमित्र पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, यावर्षीचा पक्षिमित्र जीवन गौरव पुरस्कार नाशिक येथील श्री. दिगंबर गाडगीळ यांना जाहीर करण्यात आला. इतर पुरस्कारांपैकी पक्षी संशोधन पुरस्कार सालिम अली सेंटर फॉर ऑर्निथालॉजी कोइम्बतुर येथील पक्षी शास्त्रज्ञ डॉ. शिरीष मंची यांना, पक्षी संवर्धन व सुश्रुषा पुरस्कार अमरावती येथील प्रसिद्ध वन्यजीव प्रेमी श्री. राघवेंद्र नांदे यांना तर पक्षी जनजागृती पुरस्कार अकोला येथील श्री. अमोल सावंत यांना जाहीर करण्यात आला आहे. पक्षी सबंधित विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा गौरव व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र पक्षिमित्र तर्फे २०१९ पासून या पुरस्कारांची सुरुवात करण्यात आली असून यामध्ये दरवर्षी चार पुरस्कार देण्यात येत असतात. या पुरस्काराचे वितरण ३६ व्या महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनात करण्यात येणार असून यावर्षी महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन सांगली येथे २३-२४ डिसेंबर २०२३ मध्ये होणार आहे. या पुरस्कारांचे वितरण संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र पक्षिमित्र तर्फे संस्थेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर यांनी कळविली आहे.


 

स्व. अण्णासाहेब वझे स्मृती स्व. प्रकाश गोळे महाराष्ट्र पक्षिमित्र शिष्यवृत्ती

Late Annasaheb Waze memorial

Late Prakash Gole Maharashtra Pakshimitra Fellowship

 

महाराष्ट्रातील तरुण पक्षी अभ्यासकास दरवर्षी स्व. प्रकाश गोळे महाराष्ट्र पक्षिमित्र शिष्यवृत्ती (Late Prakash Gole Maharashtra Pakshimitra Fellowship) देण्यात येणार आहे. या शिष्यवृत्ती अंतर्गत किमान ६ महिने ते १ वर्ष कालावधीत एखाद्या पक्ष्यावर किंवा पक्षी अधिवासात अभ्यास करून अहवाल सादर करावा लागेल. या शिष्यवृत्ती अंतर्गत रु. ११०००/- आर्थिक सहाय्य देण्यात येईल. (२०२३-२४ या वर्षातील शिष्यवृत्ती स्व. अण्णासाहेब वझे यांचे स्मृती प्रित्यर्थ श्री. उदय वझे, अकोला यांनी प्रायोजित केली आहे.)

नियमावली –

१. अर्जदार महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असावा. किमान १२ वी पास, पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेत असल्यास उत्तम. वयोमर्यादा १८ ते २५ वर्षे ( + २ वर्षे )

२.  अभ्यास/ संशोधन प्रस्ताव विहित नमुन्यात, विहित कालावधीत महाराष्ट्र पक्षिमित्रकडे सादर करण्यात यावा. प्रस्ताव इंग्रजी किंवा मराठी मध्ये असावा.

३.  संशोधन प्रकल्प महाराष्ट्र राज्य क्षेत्रातील असावा. संरक्षित क्षेत्रातील अभ्यास प्रकल्पासाठी रीतसर परवानगी घेण्याची जबाबदारी अर्जदाराची असेल.  

४.  संशोधन / अभ्यास क्षेत्र हे पक्षी विषयक संशोधन, संवर्धन, सर्वेक्षण अथवा जनजागृती सबंधित असू शकेल.

५.  अभ्यास/ संशोधन प्रकल्पाचा कालावधी ६ महिने ते १ वर्ष इतका असावा.

६.  प्रकल्प सादर करतांना शाळा महाविद्यालयाचे किंवा मार्गदर्शकाचे शिफारसपत्र सोबत जोडणे आवश्यक आहे.

७.   पहिला अंतरिम अहवाल ६ महिन्यानंतर सादर केल्यानंतर शिष्यवृत्ती ५० टक्के रक्कम अदा करण्यात येईल. उर्वरित रक्कम व प्रमाणपत्र  संपूर्ण अहवाल सादर केल्यानंतर व समितीने मंजूर केल्यानंतर पुढील संमेलनात देण्यात येईल.

८.  प्राप्त प्रस्तावामधून एका उत्कृष्ट प्रस्तावाची निवड,  महाराष्ट्र पक्षिमित्रच्या निवड समिती कडून करण्यात येईल व तसे संबंधिताना कळविले जाईल.

९.  अभ्यास प्रकल्पावर आधारित शोध निबंध, लेख, सादरीकरण इ. मध्ये “महाराष्ट्र पक्षिमित्र” चा उल्लेख करणे अनिवार्य राहील. प्रकल्पावर आधारित लेख “पक्षिमित्र” अंकासाठी लिहून पाठवावा लागेल तसेच या विषयावरील सादरीकरण संमेलनात करण्यात यावे.

१०. महाराष्ट्र पक्षिमित्र कार्यकारिणी सदस्य, सल्लागार मंडळ तसेच पक्षिमित्र संपादक मंडळ यांचे कुटुंबीय या शिष्यवृत्ती साठी ग्राह्य धरले जाणार नाहीत. 

शिष्यवृत्तीचे प्रस्ताव पाठविण्याची अंतिम तारीख २५ नोव्हेंबर २०२३ आहे. आपले प्रस्ताव महाराष्ट्र पक्षिमित्रच्या पत्त्यावर, कार्यवाह, महाराष्ट्र पक्षिमित्र, व्दारा प्रा.डॉ. गजानन वाघ, ६३, अरण्यार्पण, समता कॉलनी, कठोरा रोड, व्हीएमव्ही पोस्ट, अमरावती ४४४६०४ किंवा Scan केलेला संपूर्ण प्रस्ताव PDF स्वरुपात संस्थेचा इमेल- pakshimitra@gmail.com वर पेपरलेस सुद्धा पाठविता येईल. अर्जाचा नमुना व शिष्यवृत्ती सविस्तर माहिती येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे.


 

महाराष्ट्र पक्षिमित्र पुरस्कार २०२३

पक्षी संवर्धन, जनजागृती या क्षेत्रात सातत्याने केलेल्या कामाबद्दल तसेच पक्षी विषयक संशोधन, संवर्धक, जनजागृती, पक्षी उपचार, सेवा व सुश्रुषा या क्षेत्रात कार्यरत व्यक्ती / संस्थांचा गौरव व्हावा व त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्धेशाने २०१९ पासून महाराष्ट्र पक्षिमित्र तर्फे पुरस्कार देण्यात येत आहेत. यावर्षी २०२३ सालासाठी खालील पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

१. महाराष्ट्र पक्षिमित्र जीवन गौरव पुरस्कार
२. महाराष्ट्र पक्षिमित्र पक्षी संवर्धन व सुश्रुषा पुरस्कार
३.  महाराष्ट्र पक्षिमित्र पक्षी संशोधन पुरस्कार
४. महाराष्ट्र पक्षिमित्र पक्षी जनजागृती पुरस्कार


याबाबत संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.


महाराष्ट्र पक्षिमित्र संस्थेचे उद्दिष्ट

'मिळून सारेजण करु व्दिजगण रक्षण!' या आमच्या ब्रीदवाक्याप्रमाणे पक्षांचे संरक्षण करणे आणि महाराष्ट्रातील सर्वदूर पसरलेल्या पक्षीमित्रांचे संघटन व त्यांचे कार्य एकत्रितपणे पुढे आणणे.


 

महाराष्ट्र पक्षिमित्र संस्थेचे कार्य 

पक्षीमित्र संमेलने, पक्षी अभ्यास, पक्षी गणना, पक्षीमित्र पुरस्कार इ. कार्यक्रम आयोजित करुन पर्यावरणाचा प्रचार, प्रसार, संवर्धन, संरक्षण करणे.


Support us

Maharashtra Pakshimitra has been striving to protect Birds of Maharashtra since the past 20 years. Being a non-profit NGO, we rely on your help in securing funds. Please contribute.


 

महापक्षी गणना

सन २०१० पासुन संस्थेच्या वतीने महापक्षी गणनेचे आयोजन करण्यास सुरूवात झाली. सर्वसाधारण पणे जानेवारी महीन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यामध्ये ही गणना घेण्यात येते. प्रतीवर्षी या बाबत तारखा जाहीर करण्यात येतात. सदर १५ दिवसा दिवसांमध्ये कोणत्याही एका दिवशी कोठेही २ तास ही गणना करणे अपेक्षीत आहे. संपूर्ण १५ दिवस सुध्दा किंवा त्यातील काही दिवस विविध ठिकाणी गणना करण्यात येते. या गणने साठी वय लींग, व्यवसाय, शिक्षण इत्यादी कसलीही अट नाही. प्राथमीक पक्षी ओळख असणे अपेक्षीत आहे. सदर गणनेचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे पक्षीमित्रांना या कामात आवड वाढावी, पक्षीनिरीक्षण छंदाच्या पलीकडे जावे व या मिळणा-या महीतीचा वापर करून पक्षांच्या संवर्धन संरक्षणाचे प्रकल्प हाती घेणे हे आहे
या पक्षीगणनेचे संमन्वयक म्हणून श्री. शरद आपटे काम पहात आहेत.
सन २०१५ सालच्या पक्षी गणना कार्यक्रम नजीकच्या कालावधी मध्ये जाहीर होइल.
अधिक माहीतीसाठी संपर्क साधा.
१. समन्वयक : श्री. शरद आपटे
फ़ोन नं. : ९८९०३८४४००
इ-मेल : aptesharad@yahoo.in
2. कार्यालय :
फ़ोन नं. : ९८२२८७५७७३
इ-मेल : pakshimitra@gmail.com

Some commonly seen birds of Maharashtra

साळुंकी
Common Myna
भांगपाडी मैना
Brahminy starling
सातभाई
Large Grey Babbler
वेडा राघू
Small Green Bee Eater
नाचण
White Browed Fantail
पारवा
Rock Pigeon
भारद्वाज
Greater Coucal
होला
Laughing Dove
जांभळा शिंजीर
Purple Sunbird
शिंजीर
Purple Rumped Sunbird
चीरक
Indian Robin
गप्पीदास
Pied Bushchat
कोतवाल
Black Drongo
कोकिळ
Asian Koel
डोमकावळा
Jungle Crow
गावकावळा
House Crow
पाणकावळा
Little Cormorant
पिसाळ बगळा
Little Egret

बुलबुल
Red Vented Bulbul

सुगरण
Baya Weaver

खंड्या
White - Throated Kingfisher

पांढरा धोबी
White Wagtail

अबलख धोबी
White Browed Wagtail

तुतवार
Common Sandpiper

शेकाट्या
Black Winged Stilt

ठिबक्यांचा तुतवार
Wood Sandpiper

घार
Black Kite

शिक्रा
Shikra

राखी धनेश
Indian Grey Hornbill

गव्हाणी घुबड
Barn Owl

नकल्या खाटीक
Rufous Backed Shrike

चिमणी
House Sparrow

वंचक
Indian Pond Heron

विभागवार समन्वयक

विदर्भ (नागपूर विभाग)

श्री. राहुल वकारे (वर्धा)

9766309792

विदर्भ (अमरावती विभाग)

श्री. अमोल सावंत (अकोला)

9822728823

उत्तर महाराष्ट्र (नाशिक)

श्री. अभय उजागरे (जळगाव)

9823773979

पश्चिम महाराष्ट्र (पुणे विभाग)

श्री. सि. ना. पुराणिक (सोलापूर)

9850503801

मराठवाडा (औरंगाबाद)

श्री. महेंद्र देशमुख (औरंगाबाद)

9421746650

कोकण (मुंबई)

श्री. अविनाश भगत (ठाणे)

9892061899

जिल्हा समन्वयक

विदर्भ (नागपूर विभाग)

श्री. आनंद कानडे (नागपूर)
9960320252    

श्री. दीपक गुढेकर (वर्धा)
9423120741

रुंदन काटकर (चंद्रपूर)
9595560625    

श्री. शाहीद परवेज खान (भंडारा)
9423414773    

श्री. मुकुंद धुर्वे (गोंदिया)
9960144505

श्री. दीपक वांढरे(गडचिरोली)
9604193760

विदर्भ (अमरावती विभाग)

श्री. सौरभ जवंजाळ (अमरावती)
9689383940

प्रा. डॉ. मिलिंद शिरभाते (अकोला)
9657731118

श्री. सचिन कापुरे (बुलडाणा)
8888188508

श्री. दत्तात्रय पाईकराव (यवतमाळ)
9665868703

श्री. मिलिंद सावदेकर (वाशीम)    
9860182282

उत्तर महाराष्ट्र (नाशिक विभाग)
श्री. मधुकर जगताप (नाशिक)
9422057503

श्री. उदय चौधरी (जळगाव)
9326097339    

डॉ. विनोद भागवत (धुळे)
9422238523

श्री. ऋषिकेश लांडे (अहमदनगर)    
9225324190

पश्चिम महाराष्ट्र (पुणे विभाग)   

श्री. निखील ढगे (पुणे)
8468977520

श्री. युवराज पाटील (कोल्हापूर)
9273064500

श्री. नरेंद्र गायकवाड (सोलापूर)
9049550190

मराठवाडा (औरंगाबाद विभाग)

श्री. नागेश देशपांडे (औरंगाबाद)
9429499383

श्री. विलास सवडे (जालना)
9421665999

श्री. अनिल उरटवाड (परभणी)
8793558310

श्री. विनायक अ. दयाळ (हिंगोली)
9028906181

प्रा. डॉ. शिवाजी चव्हाण (नांदेड)
9421046372

श्री. हेमंत धानोरकर (बीड)
9960096062

श्री. धनंजय गुट्टे (लातूर)
8855803100

कोकण (मुंबई)

श्री. नंदकिशोर दुधे (मुंबई शहर)
7620193207

प्राचार्य मेघा सुर्वे (मुंबई उपनगर)
9167668151

कु. ललिता आष्टेकर पोयरेकर (ठाणे)
9867592108

श्री. आशिष बाबरे (पालघर)
7798827199

श्री. योगेश गुरव (रायगड)
8888232383

डॉ. गणेश मर्गज (सिंधुदुर्ग / सावंतवाडी)
9763468625

महाराष्ट्र पक्षीमित्र ही संस्था सन १९८१ साल पासून महाराष्ट्रात पक्षी संवर्धन संरक्षणासाठी काम करत आहे. प्रतिवर्षी पक्षीमित्र संमेलन, महा पक्षी गणना, संस्थेचे मुखपत्र 'पक्षीमित्र', पक्षी संवर्धन निधी इत्यादी प्रकल्प राबवत आहे. संस्थेच्या प्रकल्पाला आपण सुद्धा देणगी देऊन हातभार लावावा ही विनंती.

सर्व देण्ग्या 80G अन्वये सवलत पात्र

खालील दोन प्रकल्पांसाठी निधीची आवश्यकता आहे.

पक्षी संवर्धन निधी

२५ व्या महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनात गोंदिया येथील सारस पक्षांच्या संवर्धनासाठी व त्याच्या घरट्याच्या अधिवासाच्या संरक्षणसाठी पाच लाख रुपयाचा निधी उभा करण्याचे ठरवण्यात आले. हा निधी आता पर्यंत फक्त १,४०,०००/- इतकाच जमला आहे. आता आपण हा 'पक्षीसंवर्धन निधी' या नावाने पुढे नेत आहोत. पाच लाख एवढा निधी जमवण्याचे ध्येय्य आहे. जमलेले पैसे बॅंकेत ठेवले आहेत. या पैशातून येणारे व्याज प्रतिवर्षी आपण एका पक्षी संवर्धन प्रकल्पाला देणार आहोत. प्रकल्पाची निवड कार्यकारी मंडळ करेल.

आपण सुद्धा सदर "पक्षी संवर्धन निधी" साठी आपल्या परीने देणगी देऊन हातभार लावावा.

त्रैमासिक अंक निधी

महाराष्ट्र पक्षीमित्र संस्थेचे मुखपत्र त्रैमासिक अंक 'पक्षीमित्र' हा आपण दर तीन महिन्यांनी प्रकाशीत करत असतो. या अंकाला छपाई व पोस्टेज मिळून वार्षीक २५,०००/- ते ३०,०००/- रुपये खर्च येतो. संस्थेचे नियमीत उत्पन्न काहीच नाही त्यामुळे हा अंक परवडत नाही. पक्षीमित्र संस्थेच्या व पक्षी संवर्धन संरक्षण कार्यात या अंकाची अत्यंत आवश्यकता आहे. याच साठी हा अंक असाच चालू ठेवावा असे वार्षीक सर्वसाधारण सभेत ठरवण्यात आले आहे. याच्या खर्चासाठी त्रैमासिक अंक निधी उभा करण्याचे ठरवण्यात आले आहे. आपण सुद्धा या अंकासाठी देणगी देऊन हातभार लावावा ही नम्र विनंती.

श्री. भाऊ काटदरे
पत्ता : ११, युनायटेड पार्क, मरकंडि, चिपळूण, रत्नागिरी ४१५ ६०५
जिल्हा : रत्नागिरी 
दुरध्वनी क्र :   -
मोबाईल क्र : २३५५२५३०३०

 

श्री. दिगंबर गाडगीळ
पत्ता : ३९, "मंजिरी", आनंदवन, कॉलेज रोड, नाशीक -४२२ ००५
जिल्हा : नाशीक

दुरध्वनी क्र : ०२५३-२५७७९६८
मोबाईल क्र : ९८८१०७९७११

इ-मेल : dkgadgil@indiatimes.com / dgadgil09@gmail.com

 

 डॉ. दिलीप यार्दी 
पत्ता : १२०, शास्त्री नगर, गारखेडा रोड, औरंगाबाद ४३१ ००५
जिल्हा : औरंगाबाद
दुरध्वनी क्र : ०२४०-३२७६३८
मोबाईल क्र : ९४२२७०४२५१
इ-मेल : yardidilip@yahoo.co.in

 

 डॉ. अनिल पिंपळापूरे
पत्ता : Q - १२, सिद्धीविनायक अपार्टमेंट, लक्ष्मीनगर, नागपूर २२
जिल्हा : नागपूर
दुरध्वनी क्र : २२३०२२
मोबाईल क्र : ९८८१७१९४६६

 

श्री. बापूसाहेब भोसले
पत्ता : यशोदा, निसर्ग हॉटेल जवळ, सम्राट नगर, पार्थडी रोड, शेगाव, जि. अहमदनगर.
जिल्हा : अहमदनगर
दुरध्वनी क्र :   -
मोबाईल क्र : ९८२२६३३१३३
इ-मेल : bhosale.prata7178@gmail.com