Skip to content

पक्षिमित्र अंक

पक्षिमित्र

संपादक – किरण मोरे

वर्ष – १५ वे

अंक – २ ला

१ जानेवारी २०२५

पाने – २४

मानवाचा प्राचीन इतिहास ते भविष्य याचे अद्भुतरित्या विश्लेषण करणारे लेखक युवाल नोवा हरारी. यांचे पुस्तक प्रकाशित होणे ही विश्वातील मोठी घटना समजली जाते. ते मागील महिन्यात आपल्या नेक्सस या पुस्तकाच्या प्रचारासाठी भारतात येऊन गेले. सोशल मीडियावरील लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते म्हणतात, “Most information, it’s junk. Truth is often expensive and complicated, while fiction is cheap, simple, and abundant.”

जगामध्ये जी काही माहिती मोठ्या प्रमाणात पसरवली अथवा पोहोचवली जाते ती जास्त करून खरी नसते आणि जशी जशी नवीन तंत्रज्ञानांमधून ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल ती अधिकाधिक फिक्शन चे स्वरूप घेईल. या माहितीच्या जंजाळापासून पक्षी विश्वही कसे अपवाद राहील. यात सुद्धा संशोधनात्मक ज्ञानापेक्षा बऱ्याचदा खोटी माहितीच पसरवली जाते. उदाहरणार्थ, ‘पक्षाला एकदा माणसाने हात लावला की त्यांना इतर पक्ष टोचून मारतात. चातक पक्षी पावसाच्या पाण्यावरच जिवंत राहतात. पक्षांना खाद्य, पाणी नियमितपणे दिल्याने त्यांचे संवर्धन होईल. ‘ या गोष्टींवर बहुसंख्य चटकन विश्वास ठेवतात त्यामुळे निसर्गाच्या अन्नसाखळीतील महत्त्वाच्या या घटकाचे सामान्य करून होऊन जाते.

2021-2024

2016-2020

2011-2015

2010